asmatathi.com

  Sarpanch Mangesh Sable

Sarpanch

  Sarpanch Mangesh Sable

नमस्कार  मित्रांनो  गेल्या  काही दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे . या विडिओ मध्ये एक व्यक्ती आपल्या गळ्यामध्ये नोटांचा  हार घातलेला दिसत आहे आणि तो व्यक्ती एक एक बंडले काढून तहसील कार्यालयासमोर नोटा उधळत आहे . तर हि व्यक्ती आहे पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे ते अवघ्या २५ वर्षी गावाचे सरपंच म्हणून  निवडून  आले आहेत .फुलंब्री  तालुक्यातील  पायगा गावाची सूत्रे त्यांनी  हातात घेतली  आणि त्यांच्यासमोर पहिली  समस्या  उभी  राहिली झाले असे कि गावातील दोन्ही ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शेतकऱ्या बरोबर ग्रामथांचे हाल झाले होते . ग्रामपंचायत कडून अनेकदा मागणी करूनही  महावितरण विभाग दखल देत नव्हते शेवटी नवनिर्वाचित सरपंच यांनी २ जानेवारी रोजी अंगावरील कपडे कडून महावितरण कार्यालय गाठले .त्यांचा हा अवतार पाहून एकाच तारांबळ उडाली आणि महावितरण अधिकाऱ्यांनी तात्काळ यंत्रणा हलवली व त्यानंतर चार वाजे पर्यंत गावात ट्रान्सफॉर्मर  हजार केले . 

प्रकरण नेमके काय आहे . 

महाराष्ट्र सरकार ची विहीर अनुदान योजना आहे . या योजने मार्फत शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी शासनाकडून ४ लाखांचे अनुदान मिळते . जेणेकरून शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा मार्ग उपलब्ध होईल . यासाठी ऑनलाईन / ऑफलाईन  अर्ज करता येतो तर पायगा गावातील ग्रामस्थांनी विहिरी साठी अर्ज  केले होते . मंगेश साबळे यांनी गावातील ग्रामस्थांच्या  २० विहिरींची फाइल्स तयार केल्या होत्या व BDO साहेबांकडून मनरेगा मार्फत जलसिंचन विहीर त्यासाठी सरकार ४ लाख रुपये मंजूर करते . त्या विहिरीसाठी फाइल्स दाखल केल्या व त्यांनी तहसीलदार मॅडम यांना सांगलीतले कि मी गरीब लोकांचे काम करतो आपणास विनंती आहे कि तुम्ही विहिरी मंजूर कराव्यात मंगेश साबळे यांना मॅडम बाहेर थांबण्यास सांगितले व  रोजगार सेवक आणि इंजि . यांना आत बोलवण्यात आहे त्यांना सांगितले  कि त्यांच्या कडून १२ हजार रुपये प्रत्येक विहिरीचे (Commission ) घ्या . त्यानंतर T.S , Geotagging ,Estimation यासाठी इंजि . १५ हजार रुपये घेतात (असा त्यांचा  आरोप  आहे ) हा सर्व प्रकार पाहून मंगेश साबळे यांना प्रचंड संताप आला आणि त्यांनी तहसील कार्यालयासमोर पैशांचा 


पाऊस पडला . या सर्व प्रकारची नोंद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली आहे व सखोल चौकशीचे आदेश  दिले आहेत . 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *